नौदलाच्या जवानाला जिवंत जाळून फेकले नाल्यात

मुंबई, ७ फेब्रुवरी २०२१: भारतीय नौदलाच्या जवानाला कथित रित्या चेन्नई मधून  अपहरण करून जिवंत जाळण्यात आल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे. ही घटना महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील आहे.  मृतक, वय २७ वर्षीय सूरज कुमार दुबे आयएनएस पायनियर कोयंबटूर येथील लीडरशिप ट्रेनिंग आस्थापना येथे तैनात होते. ते गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता होते. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा ते मुंबईतील नाल्यात जखमी अवस्थेत आढळले.  परंतु नेव्ही रूग्णालयात उपचार सुरू असताना काल रात्री त्यांचे निधन झाले.

नौदलाचे एक सैनिक सूरज कुमार दुबे ३० जानेवारी रोजी रजा संपल्यानंतर कोयंबतूरला ड्युटीमध्ये सामील होणार होते. ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ते रांचीहून विमानाने हैदराबादला पोहोचले. पण रात्री हैदराबादहून ते अचानक बेपत्ता झाले. त्यांचे दोन्ही मोबाईल सतत स्विच ऑफ येत होते.

यासंदर्भात घरातील सदस्यांनी गुन्हा दाखल केला होता आणि पलामू एसपीला जवान शोधण्यासाठी विनवणी केली. पलामू पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडे जाऊन जवान शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, हा जवान मुंबईत जखमी अवस्थेत आढळला.

असं म्हटलं जात आहे की, सैनिक सूरजकुमार दुबे हे मुंबईच्या पालघर येथे जखमी अवस्थेत आढळले होते. त्यांना जिल्हा रुग्णालय पालघर येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्यांना नेव्ही हॉस्पिटल मुंबई येथे रेफर केले.  परंतु येथे दुपारी एकच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. अत्यधिक जळल्या मुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सूरज मे महिन्यात लग्न करणार होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा