गोल पोस्ट राष्ट्रीय नवी दिल्लीत वकील आणि पोलिसात हाणामारी

नवी दिल्लीत वकील आणि पोलिसात हाणामारी

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे तीस हजारी कोर्टात पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दरम्यान गोळीबार आणि जाळपोळ झाल्याचेही समोर येत आहे.
या गोळीबारात एक वकील जखमी झाला आहे.त्याला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पार्किंगच्या कारणावरून हा वाद झाल्याचे प्राथमिक माहिती वरुन समोर येत आहे.या परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version