मुंबई, 3 नोव्हेंबर 2021: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी मुंबईत मोठी कारवाई केली. विलेपार्ले परिसरात करोडोंचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विलेपार्के परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.
कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.
जेएनपीटीमध्ये अफूचे तीन कंटेनर, कारवाई कधी?’
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काल (मंगळवार, 2 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे काही अधिकारी बडे ड्रग्ज विक्रेते आणि माफिया यांना सोडून देतात, मात्र काही ग्रॅम ड्रग्ज जप्त केल्यावर लोकांना गोवले जाते, असा आरोप केला होता. त्यांचे प्रकरण मोठे करुन वसुली केली जाते. आजही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) अफूचे तीन कंटेनर उभे आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही?, असा सवाल त्यांनी केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे