‘बोट दाखवुन, बोट थांबवा’ असे म्हणत साचलेल्या पाण्यात नाव उतरवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

16

पुणे, १३ सप्टेंबर २०२२: मोठ्या पावसांमुळे पुणे शहर जलमय झाले असून, रस्त्यांचे ओढे, नाल्यात रूपांतर झाले आहे. वेगवेगळ्या कामांसाठी पुणे महानगरपालिकेने, ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होत आहेत.

पावसामुळे शहरातील रस्ते, वाहतूक, ड्रेनेज व्यवस्था आदींच्या बाबतीत महापालिकेचा नियोजन शुन्य कारभार असून त्याचा त्रास पुणेकर नागरिकांना होत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे महापालिकेच्या समोर नाव (बोट) आणली आणि पाण्यातून रस्ता पार करण्यासाठी ‘बोट दाखवुन,बोट थांबवा’ हे आंदोलन करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे