विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी पुन्हा नीलम गोऱ्हे

मुंबई, ८ सप्टेंबर २०२०: आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्याबरोबरच आज विधानसभेच्या सभापतीची निवडणूक देखील होणार होती. मात्र भाजपनं याला विरोध करत कोर्टात धाव घेतली होती. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर आज निवडणूक पार पाडत उपाध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड झाली आहे.

यासाठी भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली होती.

काय होता वाद

कोरोना संकटकाळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रविण पोटे हे परिषदेवरील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यात निवडणुकीची घाई का? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता.

उद्धव ठाकरेंनी केले अभिनंदन

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो” असेही मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करताना म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा