पुणे, ७ फेब्रुवरी २०२१: पबजी वर भारतात बंदी आणल्याने सर्व युजर्स नाराज झाले होते. मात्र ही पोकळी भरून काढण्यासाठी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या महिन्यात २६ जानेवारी रोजी nCore गेम्सने FAU-G ही बॅटल गेम लाँच केली. पबजी गेम ला पर्याय म्हणून मोठ्या संख्येने ही गेम डाऊनलोड करण्यात आली. २४ तासांत गुगल प्ले स्टोरवरुन तब्बल १ मिलियन (१० लाख) युजर्सने हा गेम डाऊनलोड केला. आतापर्यंत ५ मिलियन्स (५० लाख) युजर्सनी हा गेम डाऊनलोड केला आहे.
परंतु यानंतर या गेम ला निगेटिव्ह रेटिंग देण्यात आले. ही गेम युजर्सना आवडली नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. युजर्स आणि पबजी प्लेयर्स या गेमला गुगल प्ले स्टोरवर निगेटिव्ह रिव्ह्यू देत आहेत. या गेमला सुरुवातीला ४.७ स्टार्स रेटिंग मिळालं होतं. परंतु आता या गेमला गुगल प्ले स्टोरवर सरासरी ३.० स्टार्स रेटिंग मिळालं आहे. पबजी प्लेयर्सना ही गेम आवडलेला नाही. त्यामुळे त्यांनी या गेमला निगेटिव्ह रिव्ह्यू दिलेत सोबत त्याला १ स्टार मार्क केलं आहे.
ही गेम डेव्हलप होण्यासाठी बराच काळ लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यातील बरेच ऑप्शन अजूनही बऱ्यापैकी चालत नसल्याचेही युजर्स सांगत आहेत. ही गेम बनवणाऱ्यांनी या गेमच्या ग्राफिक्सवर चांगलं काम केलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही गेम खेळताना वळता (धावताना टर्न घेता) तेव्हा गेम मध्येच अडकते. ही गेम सध्या अपूर्ण आहे. ही गेम डेव्हलप व्हायला वेळ लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे