नेपाळच्या हॉटेलमध्ये ८ भारतीय मृतावस्थेत

21

नेपाल: पर्यटनासाठी गेलेले आठ भारतीय हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत सापडले आहेत.
दामन येथील एका हॉटेलमध्ये हे भारतीय मुक्कामासाठी होते. यातील सर्व भारतीय पर्यटक केरळ राज्यातील आहेत.

या बाबत बोलताना पोलीस अधिकारी राठोड म्हणाले की, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माकवानपूर येथील जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस अधिकारी सुशील सिंह राठोड यांनी अशी माहिती दिली.

नेपाळ मध्ये सध्या खूप थंडी आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी हॉटेल रूम मध्ये काही ना काही उपाय योजना केली जाती. पर्यटकांच्या रुममध्ये गॅस हीटर होता, नेपाळमध्ये सध्या थंडी आहे. खोली आतून बराच काळ बंद असल्याने गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हॉटेल रूम जर पूर्ण हवा बंद असेल तर कमीत कमी थोडी खिडकी उघडी ठेवणे गरजेचे असते. आज काल वातानुकूलित रूम मध्ये हवा येण्यासाठी थोडीशी ही जागा शिल्लक नसते व असे अपघात समोर येतात.