नेटफ्लिक्सने राज आणि डीके सोबत केला करार

मुंबई, ९ ॲागस्ट, २०२२: राज निदिमोरू आणि कृष्णा डीके, ज्यांना मनोरंजन क्षेत्रात राज आणि DK म्हणून ओळखले जाते, त्यांच्या ‘डीटुआर फिल्म्स’ बॅनरखाली तयार होणाऱ्या चित्रपट आणि वेब-मालिकांसह त्यांच्या सर्व नवीन प्रकल्पांसाठी नेटफ्लिक्स ने त्यांच्यासोबत अनेक वर्षांचा,बहु-प्रोजेक्ट करार केला आहे.

प्रतिस्पर्धी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरील ‘द फॅमिली मॅन’ या समीक्षकांनी सुचवलेल्या आणि कौतुक केलेल्या वेबसिरीज चे राज आणि डीके क्रिएटर आहेत.

नेटफ्लिक्सच्या आगामी ‘गन्स अँड गुलाब’ या कॉमेडी क्राईम थ्रिलर मालिकेचे शो-रनर आणि दिग्दर्शक म्हणूनही ते काम पहात आहेत.

ही कथा प्रेम आणि निष्पापपणाची कथा आहे, पहिल्या प्रेमापासून ते पहिल्या हत्येपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टींची ही कथा आहे. गेल्या वर्षीचा हिट तेलगू चित्रपट,‘ सिनेमा बंडी’ हा देखील या दोघांनीच तयार केला आहे, जो सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित आहे.

“राज आणि डीके हे त्यांच्या अनोख्या आणि कल्पक कथा सांगण्याच्या शैलीसह एक पॉवरहाऊस स्टुडिओ देखील आहेत. राज आणि डिके सोबत,जगभरातील नेटफ्लिक्स च्या सदस्यांना उत्कृष्ट मनोरंजन देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,असे नेटफ्लिक्स च्या कंटेन्ट व्हि.पी. मोनिका शेरगिल यांनी सांगितले. या दोघांनी विकसित केलेले आणि तयार केलेले सर्व नवीन प्रकल्प नेटफ्लिक्सवर उपलब्ध होतील.

राज आणि डीके म्हणतात “नेटफ्लिक्स हे स्ट्रीमिंग क्षेत्रातील एक अग्रणी नाव आहे. चित्रपट आणि वेब सिरीज निर्मितीसाठी, रोमांचक,अनोख्या कथा तयार करण्यासाठी आणि स्वतःला आव्हान देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,”

गेल्या वर्षी नेटफ्लिक्सने ‘दिल चाहता है’, ‘रॉक ऑन’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘डॉन’ सारख्या चित्रपटांमागील बॅनर असलेल्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटसोबत अशीच भागीदारी केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा