पुण्यात पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार नवीन बसेस, पुणेकरांचा प्रवास होणार आरामदायक

6

पुणे,२२ जुलै २०२३ : पुण्यातील वाढते नागरीकरण आणि शहराच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन नागरिकांसाठी अनेक पायाभूत सोई सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे.काही दिवसात राहिलेला टप्पाही पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर मेट्रोचा विस्तार आणखी वाढणार आहे. त्याचवेळी बस प्रवास अधिक चांगला करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएलच्या ताफ्यात आता नव्या बसेस दाखल होणार आहेत. प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता महिन्याभरात दाखल होणाऱ्या या बसेसमुळे नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी, सूत्र हातात घेतल्यापासून अनेक निर्णयांची अंमलबजावणी सुरु केली आहे. चालकांना शिस्त लावण्यापासून अधिकाऱ्यांनी पीएमपीमध्ये प्रवास करण्यापर्यंतचा निर्णय त्यांनी घेतला आहे.त्यांनी स्वत: पीएमपीमधून प्रवास केला.आता पुणेकरांसाठी नव्या बसेस घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.ऑगस्ट महिन्यात या नवीन १९२ वातानुकूलित बस येणार आहेत. या बसेसमुळे पुणेकर आणि पिंप्रीचिंचडकरांचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे. या बसेस निगडी, चऱ्होली आणि कोथरूड डेपोतून सुटणार आहेत.नवीन बसेस येत असल्यामुळे पीएमपी वरील भार कमी होणार आहे.

पीएमपीच्या माध्यमातून रोज सुमारे दोन लाख पुणेकर प्रवास करतात.पीएमपीएल कडे असणाऱ्या सध्याच्या बसेसपैकी अनेक बसचे आयुर्मान संपलेले आहे. यामुळे पीएमपीएलच्या ताफ्यात एकूण ६५० बस टप्पाटप्याने येणार होत्या.ऑगस्ट महिन्यात १९२ बसेस दाखल होत आहे.या नव्या बसेस १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक स्वरूपाच्या आहेत.यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्यास मदत होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा