‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुन्हा एकदा पुढे ढकलले, अतिवृष्टीच्या कारणामुळे चौथ्यांदा कार्यक्रम रद्द

जेजुरी, २२ जुलै २०२३ : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे उदया होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून केलेले नियोजन कोलमडत असून, ज्या नागरिकांना दाखले किंवा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, त्यांना आणखी काळ ताटकळत बसावे लागणार आहे. चौथ्यांदा कार्यक्रमाचा मुहूर्त चूकत आहे.

प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना तसेच जय्यत तयारी करण्यात येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचा मोठा फटाका बसत असून, कोट्यवधी खर्ची घातलेला निधीदेखील वाया जात आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला, त्यामुळे पुन्हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय.

जिल्हाधिकाऱ्यांपासून प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यापासून इतर सर्व वरिष्ठ अधिकारी हे अहोरात्र नियोजनात व्यस्त होते. मात्र कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला जात असल्याने अधिकाऱ्यांमधून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमासाठी ३५ ते ४० हजार नागरिकांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा