ऑस्ट्रेलिया वनडे संघाचा नवा कर्णधार जाहीर

पुणे, २० ऑक्टोबर २०२२ : आज टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेचा पाचवा दिवस आहे. आजही ऑस्ट्रेलियामध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत, याच दरम्यान ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने वनडे क्रिकेट संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. काही दिवसापूर्वी एरोन फिंच ने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता.

एरोन फिंच ने घराच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या, वनडे मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. यानंतर क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाच्या एक दिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार ? याची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती.

पण आता ऑस्ट्रेलिया बोर्डाने ऑस्ट्रेलिया वनडे क्रिकेट साठी नवीन कर्णधाराची नियुक्ती केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज पेट कमिन्सकडे आता ऑस्ट्रेलिया वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पेट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा २७ वा कर्णधार असेल

पेट कमिन्सने ऑस्ट्रेलियाकडून ४३ कसोटी ७३ एकदिवसीय आणि ४२ टी ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. ७३ वनडे सामने खेळताना ११९ विकेट घेतल्या आहेत. त्यांनी कसोटी मध्ये नेतृत्व करताना उत्तम कामगिरी केली आहे, यावर्षी घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या एशेस मालिका ऑस्ट्रेलिया संघाने ४-० अशी जिंकली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा