मुंबई, ३१ जुलै २०२० : राज्यात गेले काही दिवस कोरोना वेग हा मंदावल्याचा दिसत असताना अचानक गेल्या २४ तासात नवे कोरोना रुग्ण वाढीचा उच्चांक झाला आहे.ज्यामुळे प्रशासना समोरची संकटे हि काही कमी होतानाची चिन्हे दिसत नाही आहे. मुंबईची परिस्थिती हि नियंत्रणात येत असली तर आता पुण्यामुळे प्रशासनाचे डोकेदुखी वाढायला लागली आहे.
राज्यात गेल्या २४ तासात ११,१४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के इतका आहे. दिवसभरात ८,८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर राज्यातील रिकव्हरी रेट सध्या ६०.७३ टक्के इतका आहे.यासोबत एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या ४,११,७९८ इतकी झाली आहे.तर १,४८,१५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.२,४८,६१५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून ते घरी परतले आहेत. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी