केडीएमसीच्या पत्रीपुलाबद्दल नविन निर्णय

डोंबिवली, २१ ऑगस्ट २०२०: कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम जवळपास दोन वर्षापासून रखडले आहे. या पुलाचे काम सतत अर्ध्यावर येऊन थांबत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील याची दखल घेत केडीएमसीवर टिका केली होती. मात्र गेल्या दोन वर्षात सुद्धा या पुलाचे काम हे सूरूच आहे आणि अद्याप ही त्याला पूर्णविराम मिळाला नाही.

मात्र आता जणू कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डोळे उघडले आहेत .पुलाचे काम सूरू करून आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुलावर सध्या गर्डर टाकण्यात येत आहे. हे अवजड गर्डर टाकताना पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामंडळाने रात्री १० ते पहाटे ५ ही वेळ निवडली असून येत्या सोमवापर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. त्यामुळे या काळात पुलावर रात्रीच्या वेळी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून या वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

पत्रीपुल हा दोन वर्षापुर्वी धोकादायक पुल असल्यांने तोडण्यात आला होता. मात्र त्यानंतर नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. कारण दोन्ही बाजूची वाहतूक ही एकाच बाजूने सूरू करण्यात आली होती. त्यामुळे १५ मिनिटाच्या प्रवासाला नागरिकांना जवळपास ४५ मिनिटे ट्रफिकमध्ये काढावे लागत होते. मात्र एवढी बिकट परिस्थिती असताना देखील या पुलाकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचे म्हटले जाते.

त्यामुळे कल्याण शहरात वाहतुकीची समस्या वाढू लागली आहे. सोमवारपर्यंत रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत हे काम पूर्ण केले जाणार आहे. गर्डर टाकताना पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रात्रीची वेळ निवडण्यात आली असून ही वाहतूक २४ ऑगस्ट पासून रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत बंद ठेवली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा