लॉकडाऊनमध्ये सोन्याचे नवीन रेकॉर्ड

मुंबई, दि. १९ मे २०२०: कोरोना विषाणूमुळे जगभरातील आर्थिक उलाढाल थांबली आहे. कोरोनावर अचूक उपचार होईपर्यंत अर्थव्यवस्थेचा गाडा काही रुळावर येणार नाही. यावर मात करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु आर्थिक परिस्थिती सुधारताना दिसत नाही.

आज वर जगामध्ये जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण झाल्या त्या-त्यावेळी सोन्याने आपली चमक दाखवली आहे. सध्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा अडचणीत आले आहे त्यामुळे सोन्याने आपला उच्चांक दर्शवला आहे. सलग दुसर्‍या दिवशी सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ दिसून आली.

सोमवारी भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली, सरकारच्या २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज असूनही सेन्सेक्स सोमवारी १०६८ अंकांनी घसरून ३०,०२९ वर बंद झाला तर निफ्टी ३१३ अंकांची घसरण करून ८८२३ वर बंद झाला. बँकिंग समभागात सर्वाधिक तोटा झाला.

दरम्यान, सोमवारी शेअर बाजार खाली जात असताना सोन्याची नोंद विक्रमी पातळीकडे गेली. कारण या अस्थिर वातावरणात लोक सुरक्षित गुंतवणूकीसाठी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. व्यवसाया दरम्यान १० ग्रॅम सोने ४७,९२९ रुपयांवर पोचले.

वास्तविक, १८ मे रोजी, एमसीएक्सवरील जूनच्या सोन्याचे वायदा मूल्य ३६९ रुपयांनी वाढून ४७,७५० वर पोहोचले. व्यवसायादरम्यान, ते ४७,९२९ रुपयांच्या पातळीला गेले. तज्ञ सांगत आहेत की पुढील काही सत्रांमध्ये सोन्याची किंमत ५०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा