नवीन कामगार कायदा…

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२२ : नुकत्याच जाहीर झालेल्या कामगार विधेयकानुसार कायद्यात अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि त्यांचे नियोक्ते यांच्यातील जुने संबंध ठरवणारे नियम सुधारण्यासाठी केंद्राने चार नवीन कामगार संहिता जारी केल्या आहेत. कोडमध्ये अनेक योजनांचा समावेश आहे, ज्या अंतर्गत कर्मचार्‍यांचे पगार, पीएफ योगदान, कामाचे तास, कामाची परिस्थिती, कामगार कल्याण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण बदल केले जातील.


केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय कामगार कायद्यांशी संबंधित २९ केंद्रीय कायदे एकत्र करण्यासाठी चार कामगार संहिता लागू करणार आहे. कर्मचार्‍यांचे कामाचे तास आणि कर्मचार्‍याला मिळणारा पगार यांसारखे घटक या नियमांनुसार बदलले जातील. नवीन कामगार संहितेमुळे भारतातील रोजगाराची परिस्थिती आधुनिक काळाच्या गरजांशी जुळवून घेण्यासाठी एक आदर्श घडवेल.

या सुधारित कामगार कायद्याचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचारी आणि नियोक्त यांच्यातील संबंधांवर आधारित नियमांमध्ये सुधारणा होण्याची आशा आहे. तसेच पंधरा मिनिटेही जास्तीचे काम केल्यास ओव्हर टाईम अर्थात जादा पगार लागू होणार आहे. नोकरीत वर्षानंतर ग्रॅज्युटी, प्रॉव्हिडंट फंड लागू होणार. त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा