नवीन मारुती स्विफ्ट लॉन्च, ब्लॅक थीम मुळे गाडीला शानदार लुक…

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर २०२०: मारुती सुझुकी इंडियाने आपल्या सर्वाधिक विक्री झालेल्या हॅचबॅक स्विफ्टची खास आवृत्ती बाजारात आणली आहे. स्विफ्टची खास आवृत्ती ‘ब्लॅक थीम’ सह सादर करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
तथापि, मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्टसाठी ग्राहकांना नियमित मॉडेलपेक्षा २४,९९९ रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे. सध्या बाजारात स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत ५.१९ लाख ते ८.०२ लाखांदरम्यान आहे.

काळ्या रंगाचा वापर करून कंपनीने त्याला एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ब्लॅक थीम’ असलेल्या या नवीन स्विफ्टमध्ये ग्लॉसी ब्लॅक बॉडी किट, स्पूलर, बॉडी साइड मोल्डिंग, डोर व्हिझर आणि फॉग लॅम्प सारख्या अ‍ॅक्सेसरीज मिळतील.

कंपनीने या कारमध्ये कोणतेही यांत्रिक बदल केलेले नाहीत. या आवृत्तीत कंपनीने काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. प्रमाणित मॉडेलच्या बोल्ड लिमिटेड एडिशन मॉडेल अधिक ठळक आणि डायनॅमिक लुकसह येते.

मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले की स्विफ्टने प्रारंभापासूनच चांगली कामगिरी केली आहे. प्रीमियम हॅचबॅक विभागात या गाडीची मजबूत पकड आहे. स्विफ्टच्या तीन पिढ्यांनी या गाडीच्या वैशिष्ट्यांमध्ये, लुक आणि तंत्रज्ञानामध्ये बरेच बदल पाहिले आहेत. लॉन्च झाल्यापासून स्विफ्टच्या २३ लाखाहून अधिक मॉडेल्सची विक्री झाली आहे.

त्याचवेळी मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) ने सरकारी कर्मचार्‍यांसाठी खास ऑफर आणली आहे. त्याअंतर्गत, सणाच्या हंगामात विविध कार मॉडेल्सच्या खरेदीवर सरकारी कर्मचा-यांना ११,००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच रजा यात्रा सवलत (एलटीसी) च्या बदल्यात सरकारी कर्मचार्‍यांसाठी रोख व्हाऊचर जाहीर केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा