न्यूझीलंड च्या बेटात ज्वालामुखीचा उद्रेक

50

न्यूझीलंड: न्यूझीलंडमधील ज्वालामुखी बेट व्हाइट आयलँडवर सोमवारी अचानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली जे काही क्षणांपूर्वी तेथून जाताना दिसले होते. देशाच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने म्हटले आहे की, “व्हाईट आयलँडमध्ये मध्यम प्रमाणात ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे आणि तो आजूबाजूच्या भागासाठी हानिकारक आहे.”
ज्वालामुखी साइटवरून थेट कॅमेरा प्रसारित करण्यात आला होता त्यात असे निदर्शनास आले की स्थानिक वेळेनुसार दुपारी २.१० वाजता सहाहून अधिक लोक ज्वालामुखीच्या साइटवर फिरत होते आणि काही मिनिटांनी ज्वालामुखी उद्रेक झाला. या घटनेत लोक जखमी होण्याची भीती असल्याचे स्थानिक नगराध्यक्षांनी सांगितले.