टी ट्वेंटी विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

पुणे, २० सप्टेंबर २०२२ : १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियामध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व सहभागी देशांनी आपापले संघ जाहीर केले असून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आज (२० सप्टेंबर )१५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडकडून १५ खेळाडूंची यादी जाहीर करण्यास विलंब झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा चर्चा होती. परंतु न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून विलंब झाल्याचं कळवलं होतं. तसेच पुढील तारीख मागून घेतली होती.

न्यूझीलंडने आज केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली १५ जणांचा संघ जाहीर केला. न्यूझीलंडने गेल्या वर्षी टि ट्वेंटी विश्वचषक खेळलेल्या संघात तीन बदल केले आहेत. या संघात एका खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे जो सातव्यांदा टी ट्वेंटी विश्वचषकाचा भाग असेल, तसेच केन विल्यमसन, आयसीसी टी-२० विश्वचषकात तिसऱ्यांदा न्यूझीलंडचे कर्णधारपद भूषवणार आहे.

सलामीवीर मार्टिन गुप्टील याला संघात घेतलं असून तो विक्रमी सातव्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक खेळणारा खेळाडू ठरेल या अगोदर भारताचा मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’ यांनी सहा वेळा विश्वचषक खेळला होता.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ :

केन विल्यमसन ( कर्णधार) जिमी निशम, मिचेल सेंटनर, ग्लेन फिलिप्स, टीम साऊदी, ईश शोधी, डॅरिल मिशल, अडम मिल्ने, मार्टिन गुप्टील, लॉकी फर्ग्युसन, डेव्हन काँनवे, मार्क चपमन, मायकेल ब्रेस्वेल, ट्रेंट बोल्ट, फिन एलन

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा