नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते “दो बूंद जिन्दगी के” पोलिओ डोस उपक्रम

कर्जत:३१ जानेवारी २०२१ : कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे संपुर्ण देशामध्ये भारत सरकार आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत लहान बालकाना पोलिओ डोस उपक्रम राबविण्यात येत आहे. या मध्ये ३१ जानेवारी दिवशी महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा, तालुका तसेच गावो गावी खेडो पाडी हा उपक्रम राबविण्यात येत असतो.
जलालपूर येथे पोलिओ डोस उपक्रम राबविण्यात आला.त्या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात प्रबोध करत तसेच गावात पोलिओ विषय जनजागृती करत.सर्वांनी पोलिओ डोस साठी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले.पोलिओ डोस मुळे होणारे फायदे या वेळी लोकांना सांगण्यात आले. तसेच पोलिओ डोस न घेतल्याने बालकावर कोणते दुषपरिणाम होतात हे देखील या वेळी लोकांना सांगण्यात आले.
या वेळी जलालपूर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य वासुदेव बोराटे,प्रविण काळे,माजी सदस्य बापू कांबळे,कारकुन सदाशिव गावडे समाजसेवा भागवत धालवडे,बॅंक मॅनेजर मारूती ननवरे,शिवसेना शाखा प्रमुख स्वामी राजे मोठे, सोमनाथ बोराटे,सचिन बोराटे,हे मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा