मुंबई, १५ मार्च २०२१: राज्यात कोरोना पुन्हा जोर धरू लागला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा १५,००० पेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत तर ५० रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्याचवेळी मुंबईत १९६२ नवीन कोरोना रुग्ण समोर आले. तर ७ लोकांचा कोरोना मुळे मृत्यू देखील झाला. दरम्यान लातूर मध्ये नाईट कर्फ्यु देखील लावण्यात आला आहे.
कोरोनाची वाढती घटना पाहता लातूर जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे की, जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ५ या वेळेत कर्फ्यू राहील. एवढेच नव्हे तर ३१ मार्चपर्यंत सर्व साप्ताहिक बाजारपेठा बंद राहतील. केवळ आणीबाणी सेवांना सूट देण्यात आली आहे.
रविवारी महाराष्ट्रात १६,६५० नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात १५ हजाराहून अधिक प्रकरणे येत आहेत. काल, कोरोना मधून ८८६१ रुग्ण बरे झाले आणि घरी गेले. आतापर्यंत, महाराष्ट्रातील २१,३४,०७२ लोक कोरोना मधून बरे झाले आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२.२१% आहे. सध्या ५,८३,७१३ होम क्वारंटाईन आहेत, तर ५,४९३ लोक रुग्णालयात दाखल आहेत. महाराष्ट्रात १,२६,२३१ सक्रिय प्रकरणे आहेत.
त्याचवेळी रविवारी पुण्यात १७४० कोरोना प्रकरणे उघडकीस आली. तर ८५८ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. या दरम्यान कोरोनाचे १७ रुग्ण मरण पावले. कोरोनाचे ३५५ गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. पुणे शहरात ११,५९० कोरोना सक्रिय प्रकरणे आहेत. पुण्यात कोरोना मुळे आतापर्यंत ४९५२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे