मराठा सेवा संघ प्रणित डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या प्रभारी पदी निलेश देशमुख

5

माढा दि.३१ ऑक्टोबर २०२० :मराठा सेवा संघ प्रणित डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या पालघर, ठाणे व रत्नागिरी जिल्हा प्रभारीपदी माढा तालुक्यातील तांबवे टें येथील निलेश शशिकांत देशमुख यांची निवड राज्याध्यक्ष प्रभाकर झोड यांनी केली आहे. ‌

नुकतीच शिक्षक परिषदेच्या जिल्हा प्रभारींच्या नावांची घोषणा करण्यात आली असून पालघर व ठाणे जिल्ह्यात आपल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याने वेगळीच ओळख निर्माण करणाऱ्या राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख यांची प्रभारी पदी निवड करण्यात आल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले.

यावेळी निलेश देशमुख यांनी जिल्हानिहाय नियोजन करून,बैठक बोलावून चर्चेअंती मराठा सेवा संघ प्रणित डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या ठाणे, पालघर व रत्नागिरी कार्यकारिण्या जाहीर करून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा