गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई निलेश राणेंनी कंगना रनौतला चांगलेच सुनावले

निलेश राणेंनी कंगना रनौतला चांगलेच सुनावले

मुंबई, ३ सप्टेंबर २०२०: सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रानौत हिला माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. तसेच नुकतंच अभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबई पोलिसांविरोधात भाष्य केलं होतं. याच गोष्टीवरून निलेश राणे यांनी कंगनाला चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले, ‘पोलिसांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही ‘.
अभिनेत्री कंगना रानौत हिने गेल्या काही दिवसात एक वक्तव्य केलं होतं ज्यात ती म्हणाली होती, मुंबई पोलिसांची भीती वाटते. याच वक्तव्यावरून निलेश राणे यांनी तिला चांगलेच धारेवर धरून खडसावले आहे.
तसेच निलेश राणे यांनी ट्विट केले आहे. ज्यात ते म्हणाले, ” अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलिस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी रानौत कोण लागून गेली?? सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.” असं राणे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version