गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा निंबुतला अज्ञाताकडून दीड एकर ऊसाला आग

निंबुतला अज्ञाताकडून दीड एकर ऊसाला आग

बारामती, ११ ऑक्टोबर २०२०: निंबुत (ता. बारामती) गावाच्या हद्दीततील दिलीप प्रभाकर फरांदे यांच्या दीड एकर ऊसाला अज्ञात व्यक्तीने आग लावत तो पेटवून दिला. याप्रकरणी फरांदे यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

प्रभाकर फरांदे यांचा निंबुत गावच्या हद्दीत गट क्रमांक ६६७ मध्ये सह्याद्री फार्म नावाने शेती आहे. दि. ९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोणा अज्ञात व्यक्तीने सूड बुध्दीने फरांदे यांच्या पूर्ण वाढ झालेल्या ऊसाला मुद्दाम आग लावली असल्याची तक्रार फरांदे यांनी केली आहे. या आगीमध्ये दीड एकर ऊस जळून खाक झाल्याने फरांदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लावणाऱ्या अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम ४३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version