गोल पोस्ट महाराष्ट्र भाजपच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर महाविकास आघाडी विरोधात निषेध मोर्चा

भाजपच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर महाविकास आघाडी विरोधात निषेध मोर्चा

इंदापूर, ११ ऑक्टोबर २०२०: सोमवार दि. १२ ओक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद जामदार आणि इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी दिली.

कोविड, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना, अवैद्य बेकायदेशीर धंदे, इंदापूर तालुक्यातील रस्त्याची झालेली दुर्दशा, आरक्षण, मंदिरे तसेच इतर बाबतीत महाविकास आघाडी तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असून सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, मजूर यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या सरकारचा आणि इंदापूरच्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध करण्यासाठी पंचायत समितीचे ते तहसील कार्यालय असे निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. भाजप कार्यकर्त्याने या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष शरद जामदार आणि शकील सय्यद यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version