पश्चिम कोलंबियामध्ये सशस्त्र हल्ल्यात ९ ठार

नारिनो [कोलंबिया], १७ ऑगस्ट २०२० : पश्चिम कोलंबियाच्या नारिनो प्रांतातील सशस्त्र हल्ल्यात कमीतकमी नऊ जण ठार झाल्याचे प्रांतीय राज्यपाल झोन रोजास यांनी रविवारी सांगितले.

“सामनीगो नगरपालिकेत हिंसाचाराच्या घटनेत झालेल्या सशस्त्र हल्ल्यात कमीतकमी नऊ जण ठार झाले असून काही जखमींची देखील नोंद झाली आहे ” असे रोजास यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

राज्यपालांनी नमूद केले की मागील दोन महिन्यांत सामनीगो येथे २० हून अधिक हत्या झाल्याची नोंद आहे. ते पुढे म्हणाले की नारिओमध्ये सशस्त्र गटांची उपस्थिती आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन करीत आहे आणि त्यांनी प्रांतात शांतता आणण्यासाठी उपाययोजना करण्यास पोलिसांना आव्हान केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा