नीरा पाडेगाव, दि. २० जून २०२०: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा दरवर्षी आजच्याच दिवशी निरा येथील नीरा नदीच्या दत्त घाटावर येत असतो. यावेळी दुपारच्या विसाव्या नंतर माउलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थामध्ये स्नान घातले जाते. माऊली माऊलीच्या जयघोषात मोठ्या उत्साहात भक्त माऊलींना स्नान घालतात. हा सोहळा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दत्त घाट व नीरा परिसरामध्ये शुकशुकाट होता.
हा सोहळा यावर्षी होत नसल्याने भाविक भक्तांनमध्ये व ग्रामस्थांमध्ये दुःख होते. मात्र नीरा – पाडेगाव येथील काही भक्तांनी माऊलींच्या प्रतिकात्मक पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थामध्ये माऊली माऊलीच्या जयघोषात स्नान घातले. यामुळे सुनासुना वाटलेला हा दत्त घाट थोडक्या लोकांच्या उपस्थितीत माऊलींच्या गजराने दुमदुमून गेला.
नीरा पाडेगाव येथील वारकरी संप्रदायातील काही मोजक्या लोकांनी प्रतीकात्मक माऊली स्नान याठिकाणी केले. प्रतीकात्मकरीत्या अवघ्या २५ लोकांमध्ये हा मऊली स्नान सोहळा पार पडला व दुपारी दीडच्या दरम्यान फक्त पंधरा ते वीस मिनिटात हा सोहळा आटोपता घेतला.
या दरम्यान माऊलींच्या प्रतीकात्मक पादुकांना स्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली व पांडुरंगाची, ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली आणि हा सोहळा संपन्न झाला. मात्र येथील भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली, काही भक्तांनी हा सोहळा पुढील काळात सुरू राहावा अशी देवाचरणी प्रार्थना केली, काहींनी पुढील आयुष्यात कायम हा सोहळा ध्यानात राहील असा आहे. कारण दीडशे ते पावणेदोनशे वर्षाची परंपरा असलेला हा पालखी सोहळा यावर्षी खंडित होऊन माऊलींच्या पादुका स्नानासाठी न आल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले तर काही लोक हा सोहळा आज बंदी असतानाही पायीवारी करत आहेत. त्यातील चौघांनी या प्रतिकत्मक माऊली स्नानात सहभाग घेत टाळांचा गजर केला.
यावेळी सरपंच हरिश्चंद्र माने, विजयराव धायगुडे, शंकरराव मर्दाने, हभप दिलीप झगडे महाराज शामराव धायगुडे गजानन माने,टि के जगताप, बाळासाहेब दरेकर,
विनायक दिक्षीत आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: