पुरंदर : नीरा (ता.पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं २ मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुलींनी सावित्रीबाईसह वेगवेगळ्या ऐतिहासिक कर्तृत्ववान महिलांच्या वेश भुषा परिधान करून क्रांतीज्योतीची सावित्रीबाई फुले याच्या कार्याला सलाम केला.
आज दि.३ रोजी फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत बालसभेचे आयोजन यावेळी करण्या आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष जयश्री शिंदे, मुध्यापिका मंगल आगवणे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनीनी सावित्रीबाई फुले याच्या कार्याची माहिती आपल्याला भाषणांन मधून दिली. सावित्रीबाई यांच्या जन्मापासून ते त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले काम,त्यानी विधवा केशवपना विरोधात केलेले अंदोलन, त्याला नाभिक समाजाने दिलेला पाठींबा.अशा सावित्रीबाई च्या जीवनातील घटनांचा आढावा मुलींनी आपल्या भाषणातुन घेतला. यावेळी मुलींसाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मुलींनी इतिहासातील कर्तृत्ववान महिलां ची वेशभुशा करून इतिहासातील अनेक कर्तृत्ववान महिलांची आठवण करून दिली.
यावेळी मुख्याध्यापिका मंगल आगवणे, शिक्षक बाळकृष्ण रणदिवे, मायदेवी जाधव, नेवसे ज्योती, जयश्री परखंडे, शिरीष प्रभुणे, मनोज दीक्षित, नीलम दगडे, सारिका साबळे, प्रतीक्षा जाधव यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परीश्रम घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.