चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास वळण परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवेमुळे नागरिक त्रस्त आहेत. तरी अशा परिस्थितीत रात्री दहा च्या सुमारास तुकूम भागात राहणाऱ्या २४ वर्षीय युवक पंकज लांडगे उदारी वसूल करण्यासाठी या परिसरात गेला असता त्या उदारी असलेल्या व्यक्ति ची व त्याच्या घराची चौकशी केली. मात्र, त्या घरातील लोकांनी त्याला चोर समजून त्याची बेदम मारहाण करण्यात सुरूवात केली. त्यावेळी पंकज सोबत त्याचा एक मित्र देखील होता, परिसरातील नागरिकांनी पंकज ला व त्याच्या मित्राला एका झाडाला बांधून त्यांच्या वर बेदम मारहाण केली.
हा प्रकार सुरू असतानाच या सर्व घटनेची माहिती रामनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली, तरी पोलीस त्या परिसरात जाई पर्यंत ही मारहाण चालूच होती. तरी त्या घटनास्थळी गेल्यावर पोलीसांनी पंकजला व त्याच्या मित्राला सोडवल. आणि त्या दोघांना रुग्णालयात घेऊन गेले मात्र दुर्दैवाने रुग्णालयात जात असतानाच पंकज लांडगे चा मृत्यू झाला. पोलीसांनी या दुर्दैवी घटने नंतर संबंधित परिसरातील चौघांना ताब्यात घेतल आहे.
पोलीसांनी या प्रकरणी तपास करून घडलेल्या घटनेबाबतच नेमक कारण काय? याचा शोध लावायचा प्रयत्न करत आहेत. चंद्रपूर शहरातील संजय नगर शामनगर, इंदिरा नगर, आणि बल्लारपूर वळण मार्गावरील भागात मागील १० दिवस चाललेल्या चोराच्या अफवेमुळे नागरिक हे त्रस्त झाले होते, तरी या सगळ्या मध्ये एका निरपराध युवकाचा मृत्यू झाल्याने अफवा तसेच नागरीकांची हिंसक मानसिकता यावर चिंता व्यक्त होत आहे.












































