निर्भयाला आठ वर्षानंतर मिळाला न्याय

नवी दिल्ली : २०१२ मध्ये घडलेल्या दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडिता ‘निर्भया’ ला तब्बल आठ वर्षांनी न्याय मिळाला आहे. हे कृत्य केलेल्या चारही दोषींना आज सकाळी साडे पाच वाजता फाशी देण्यात आली. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा चारही दोषींना एकत्र फाशी देण्यात आल्याची घटना घडली आहे.
सकाळी चार वाजता दोषींना आंघोळ घालून नवीन कपडे देण्यात आले. या चारही दोषींना जल्लाद पवन यांच्याकडून फाशी देण्यात आली.
यात एकूण सात वर्षे तीन महिने आणि तीन दिवसांनी या दोषींना मृत्यूदंडांची शिक्षा मिळाली. एवढ्या वर्षात या दोषींनी पळ काढण्याचे अनेक मार्ग अवलंबले होते. परंतु पण अखेर त्यांना आज फाशी देण्यात आली आहे. आजचा दिवस हा ‘न्याय दिवस’ म्हणून घोषित करावा अशी प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चौघाही दोषींची फाशी टाळण्यासाठी त्यांच्या वकिलांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. रात्री हायकोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर सर्वात शेवटचा प्रयत्न म्हणून दोषींचे वकील ए पी सिंग यांनी मध्य रात्रीनंतर अडीच वाजता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा दाद मागितली. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

या प्रकरणात जस्टिस आर भानुमती, जस्टिस अशओक भूषण आणि जस्टिस ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे युक्तीवाद केला. यावेळी चौघांपैकी एक दोषी पवन याच्या वयाचा मुद्दा सिंग यांनी सुप्रीम कोर्टात मांडला. त्यावर आक्षेप घेत, कनिष्ठ न्यायालय, दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही या आधी अल्पवयीन असल्याचा मुद्दा नाकारल्याचं खंडपीठानं सांगितलं. तसंच या पूर्वी झालेल्या सुनावणीतलेच मुद्दे आताही मांडले जात असल्याकडेही खंडपीठानं दोषींचे वकील ए पी सिंग यांचं लक्ष वेधलं.

या चौघा दोषींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे. त्याला तुम्ही कशाच्या आधारावर आव्हान देत आहात असा थेट प्रश्न यावेळी खंडपीठानं विचारला. आणि ही याचिका निकाली काढली. त्याबरोबरच दोषींची फाशी टाळण्याचा त्यांच्या वकिलांचा अखेरचाही प्रयत्न फोल ठरला. आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला. अखेर त्यांना आज पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा