निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशीवरील सस्पेन्स कायम

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.
याबाबत आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, आरोपींच्या दया याचिकांवर सुनावणी केल्यानंतर त्यांना १४ दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. आता दया याचिका फेटाळल्यानंतर त्यांना वेळ देण्यात यावा, असा युक्तिवाद करत २२ जानेवारीची फाशी पुढे ढकलण्यासाठी वकिल प्रयत्न करत आहेत. अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे.

याबाबत वकिल राहुल मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारीला निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होऊ शकत नाही. यावेळेस जोपर्यंत राष्ट्रपती दया याचिका फेटाळत नाहीत. तोपर्यंत फाशी होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितल्याने आता निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीवर सस्पेंस कायम ठेवण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा