गोल पोस्ट राष्ट्रीय निर्भया बलात्कारातील आरोपीच्या पत्नीची घटस्फोटाची मागणी

निर्भया बलात्कारातील आरोपीच्या पत्नीची घटस्फोटाची मागणी

बिहार : निर्भया सामूह बलात्कारातील दोषी नवीनगर येथील लहंग कर्मा गावच्या अक्षयच्या आयुष्यातील अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांतच त्याला निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा होणार आहे.त्या अगोदरच अक्षयच्या पत्नीने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.

अक्षय ठाकूरची पत्नी पुनीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पुनिता यांनी औरंगाबाद फॅमिली कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रामलाल शर्मा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात अक्षयच्या पत्नीने आपल्या अर्जात असे म्हटले आहे की, ‘माझ्या पतीला बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे आणि त्याला फाशी देण्यात येणार आहे.
मात्र मला त्याची विधवा व्हायची इच्छा नाही. त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, या प्रकरणात 19 मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.संबंधित – निर्भयाच्या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचं दार ठोठावलं, बचावासाठी नवी क्लृप्ती

अक्षय ठाकूर यांच्या पत्नीचे वकील मुकेश कुमार सिंह म्हणाले की, पीडित महिलेला हिंदू विवाह कायदा १(२) अंतर्गत काही प्रकरणांमध्ये घटस्फोटाचा अधिकार मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. यामध्ये बलात्काराचे प्रकरणही समोर आले आहे. एखाद्या महिलेचा पती बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळल्यास ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते.

error: Content is protected !!
Exit mobile version