निरवांगी बसस्थानकाला काटेरी झुडपंचा विळखा…

इंदापूर, २९ सप्टेंबर २०२०: निमसाखर (ता इंदापूर) निरवांगी येथील बसस्थानकाभोवती काटेरी झुडपे, गवतासह अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या या बसस्थानकाची स्वच्छता करुन भोवतालची साफसफाई करणे आवश्यक आहे.

सध्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोठ्या प्रमाणात बंद आहेत. शाळा, कॉलेजेस यासह अनेक उद्योग व्यवसाय सुरळीतपणे सुरू नसल्याने एस. टी. बसच्या वाहतूकीच्या प्रमाणातही घट झाली असून प्रवाशांचे प्रवास करण्याचे प्रमाण अगदी नगण्य असल्याचे दिसून येते आहे. त्यातच शाळा काॅलेजेसही बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असणाऱ्या एस. टी. बसची व्यवस्था ही काहीशी अडखळतच चालली असल्याचे दिसते.

सध्या वाहतूक मोठ्या प्रमाणात नसल्याने तसेच कोरना संक्रमणाच्या प्रादूर्भावामुळे सुशिक्षितेच्या कारणास्तव प्रवाशांची आवक जावक सार्वजनिक वाहतूकीऐवजी खाजगी अथवा स्वतःच्या वैयक्तिक वाहनानेच जास्त प्रमाणात होत असल्याने या बसस्थानकाकडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील स्वच्छतेची मागणी नागरिकांकडून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा