आज होणार नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी; न्यायालयानं दिली अजची तारीख

मुंबई, 30 डिसेंबर 2021: जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना 18 डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे सुरू असलेली नितेश राणे यांच्या अर्जावरील अटकपूर्व जामीन याची सुनावणी काल पूर्ण झाली. मात्र कोर्टाने यावर अद्याप निर्णय न देता याबाबतची सुनावणी आज होणार असल्याचं सांगितलं. गुरुवारी यावर निर्णय घेतला जाईल असं कोर्टाने सांगितलं.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. यानंतर पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. मात्र, याबाबत नारायण राणे यांना पोलिसांनी नितेश राणे कुठे आहेत असं विचारलं असता हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर नारायण राणेंनी दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वकील काय म्हणाले?

धीरज जाधव,ज्ञानेश्वर माऊली आणि सचिन सातपुते हे तिघे या प्रकरणात आरोपी आहेत. या तिघांचा नितेश राणे आणि सचिन सावंत यांच्याशी संबंध आहे. या आरोपींचा नितेश राणेंशी संबंध असल्याचे तांत्रिक पुरावे असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय. आरोपी सचिन सातपुते याला नितेश राणेंच्या पीएकडून सातत्याने फोन करण्यात आले, असंही सरकारी वकील म्हणाले. तर, नितेश राणेंना अटक नाही केली तर मोर्चा काढू असं शिवसेनेचे आमदार म्हणत आहेत, सत्तेत असणारेच जर मोर्चा काढत असतील, तर मग पोलिसांवर दबाव कोण टाकतंय, असा सवाल नितेश राणेंच्या वकिलांनी केला. तसेच नितेश राणेंच्या पीएकडून आरोपी सचिन सातपुतेला फोन केल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा