सुजीत पाटकरच्या अटकेनंतर नितेश राणेंचे संजय राऊत यांच्या विषयी गंभीर विधान

मुंबई, २० जुलै २०२३ : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज जोरदार धक्का बसला. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना ईडीने अटक केली. मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. सुजीत पाटकर आणि डॉ. किशोर बिचुले यांना ईडीने अटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुजीत पाटकर यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

या प्रकरणात याआधी ईडीने त्यांची चौकशी सुद्धा केली होती. त्यांच्या घरावर छापेमारीची कारवाई केली होती. आज अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.सुजीत पाटकर यांना अटक होताच भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुजीत पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे. संजय राऊत हा चोर आहे. सुजीतचा सगळा पैसा संजय राऊतकडे होता. संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहणार नाही. कैदी नंबर ८९६९ असेल. संजय राजाराम राऊत याने तयारी करावी, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

केंद्र सरकारवर रोज आरोप करायचे. उद्धव ठाकरेंचा कामगार आता आत गेलाय. संजय राऊत हा फरार होऊ शकतो, देश सोडू शकतो. त्यामुळे लूक आऊट नोटीस काढली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो. उलटी गिनती सुरू झाली आहे. कर नाही तर डर कशाला? काही झाले तरी कारवाई होणार चोराचा पर्दाफाश होणार असे नितेश राणे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा