‘बोल राधा बोल’, ‘रेडी’ चित्रपटाचे निर्माते नितीन मनमोहन यांचे मुंबईत निधन

मुंबई, २९ डिसेंबर २०२२ :बॉलीवूड जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बोल राधा बोल, रेडी यासारखे सुपरहिट चित्रपटांचे प्रसिद्ध निर्माते नितीन मनमोहन यांचे आज, गुरुवारी निधन झाले आहे. नितीन हे प्रसिद्ध अभिनेता मनमोहन यांचे पुत्र होत.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन डिसेंबर रोजी नितीन मनमोहन यांना हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मागील दहा दिवसांपासून नितीन मनमोहन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • ‘भारत के शहीद’ मालिकेत साकारलेली चंद्रशेखर आजाद यांची भूमिका

९० च्या दशकांमध्ये लाडला, बोल राधा बोल, दस सारख्या चित्रपटांनी मनमोहन यांना वेगळी ओळख दिली होती. तर ब्रम्हचारी, गुमनाम आणि नया जमाना यासारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यांनी सलमान खान सोबत केलेला ‘रेडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. ते उत्तम निर्माता तर आहेच शिवाय उत्तम अभिनेते देखील आहेत. काही दिवसांपूर्वी दूरदर्शवनरून प्रसारित झालेल्या ‘भारत के शहीद’ या मालिकेत चंद्रशेखर आजाद ही भूमिका साकारली होती.

दरम्यान, त्यांच्या जाण्याने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरुन बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा