पूरसदृश्य भागांचा नितीश कुमार घेणार आढावा

4

बिहार, दि. २४ जून २०२० : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री संजय कुमार झा यांनी बुधवारी मधुबनी आणि जयनगर येथे भेट देणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री पूर टाळण्यासाठी होणाऱ्या कामांचा आढावा घेणार आहेत.

यापूर्वी मंगळवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कोसी, गंडक, कमला व इतर नदी पात्र, सीमावर्ती भाग व गेल्या पूर आलेल्या ठिकाणी पूर संरक्षण कार्य करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर पूर संरक्षणासंबंधी सर्व प्रलंबित योजना पूर्ण करण्यासाठी व त्या लवकरच पूर्ण करण्यासाठी नेपाळ अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे असे देखील निर्देश दिले. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी संभाव्य पुराच्या तयारीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना अशा अनेक सूचना दिल्या.

याच बरोबर त्यांनी असे सांगितले की, संचार व्यवस्था पूर्णपणे कार्यरत ठेवा, पूर येण्याच्या काळामध्ये देखील संचार व्यवस्था पूर्णपणे कार्यरत असणे गरजेचे आहे. संभाव्य पूर प्रतिबंधणासाठी सर्व तयारी आगाऊ ठेवा. पूर आल्यास जनतेला दिलासा देण्यासाठी जे काही कृती करावयाच्या आहेत, त्या सर्व तयारी प्रमाणित कार्यप्रणालीनुसार करण्यात याव्यात. जेणेकरून कोणालाही अडचण होऊ नये.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा