निवडणुकी समोर पावसाचे आव्हान

Heavy Rain

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे पण या मतदानावर पावसाचे सावट आहे. कारण पुढील काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्र याठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्यांनी दिला आहे. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे आव्हान सर्वच पक्षातील उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना असणार आहे. पावसात मतदारांना मतदानासाठी कसे बाहेर आणावे याचे आव्हान सर्व उमेदवारांसमोर असणार आहे. तर एका बाजूला निवडणूक आयोग आणि पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पडावा म्हणून चार लाख पोलीस तर सहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांची पाऊस कामाला लागली आहे. एकीकडे ज्यांचं राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे त्यांची धकदुक नक्कीच वाढली असणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा