नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कुठल्याच राजकीय पक्षाने ईव्हीएम बद्दल कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही व मुद्दा काढला नाही. ईव्हीएम बद्दल तक्रारी नोंदवलेल्या मोठ्या राजकीय पक्षांनी सुद्धा निकालानंतर मौन धारण केले आहे. याचा अर्थ आपल्या पक्षाला चांगल्या जागा जिंकता आल्या तर ईव्हीएम मध्ये दोष नाही पण आपल्या पक्षाला कमी जागा मिळाल्या तर सर्व दोष हेवीएमचाच. त्यात फिक्सिंग होते, हॅकिंग होते, राजकीय पक्षांचा हा दुटप्पीपणा जनतेसमोर आला आहे. सामान्य जनतेला गृहीत धरून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हे राजकीय पक्ष काम करतात.निवडणूक आयोगाने सुद्धा ज्या राजकीय पक्षांनी ईव्हीएम वर आक्षेप घेतला होता त्यांच्यावर जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. अशा पक्षांकडून अधिकृतरीत्या ईव्हीएम मध्ये दोष नाही असे जाहीर निवेदन लेख स्वरूपात घेऊन सार्वजनिक करण्याची ही चांगली संधी आहे.