मुंबई, ५ जुलै २०२३: याचिकाकर्त्यांचे वकील योग्य ड्रेस कोडमध्ये नाही, न्यायालयातील सुनावणीवेळी वकिलाने कोट घालने अनिवार्य आहे, असे फटकारत मुंबई उच्च न्यायालयाने सुनावनीस नकार दिला. याप्रकरणी १० जुलै रोजी सुनावणी होईल, असे न्यायमूर्ती एएस गडकरी आणि एसजी डिगे यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी होणार होती. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकिलांनी कोट घातला नव्हता. अयोग्य ड्रेस कोडमुळे याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांची सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती एएस गडकरी आणि एसजी डिगे यांच्या खंडपीठाने नकार दिला आहे. आता याप्रकरणी १० जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
अधिवक्ता कायद्याच्या कलम ४९ जीजी नुसार, प्रचलित परिस्थिती लक्षात घेऊन, कोणत्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणा समोर हजर राहताना, वकिलांनी परिधान करावयाच्या पोशाखाबाबत नियम प्रस्थापित करण्याचा अधिकार हा बार कौन्सिल ऑफ इंडियाला आहे. असेही न्यायमूर्तीने सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर