नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२३: लोकसभेत आज केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होण्यापूर्वी गदारोळ झाला. विरोधकांसह सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना शांततेचे आवाहन केले. अविश्वास प्रस्ताव हा गंभीर विषय आहे. सर्वांना याचे महत्त्व जाणून घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आसाम काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष यांच्यातील बंद दाराआड काय चर्चा झाली, यांची माहिती द्या, अशी मागणी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होण्यापूर्वी केली. यावर भाजप सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही संताप अनावर झाला. त्यांनी अशा प्रकारे विरोधी पक्ष सभागृहात मागणी करु शकत नाहीत, असे स्पष्ट केले. यावर विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले.
अविश्वास प्रस्ताव हा गंभीर विषय आहे. सर्वांनी याचे महत्त्व जाणून घ्या. मी येथे आहे ना, असे सांगत त्यांनी सर्व सदस्यांना अस्वस्थ केले. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला प्रारंभ करण्याचे आवाहन केले. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर अविश्वास प्रस्तावाला प्रारंभ झाला. आसाममधील काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात केली.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर