नको कोरोना नको… नो कोरोना नो

4

नव्या वर्षाचे आगमन झाले आणि पुन्हा एकदा कोरानोच्या बातम्या पेपर, टिव्हीवर दिसू लागल्या आहेत.
कोरोनाच्या रुग्णात पुन्हा वाढ होत असल्याने तिसरी लाट येणार की काय ? ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का? अशा अनेक प्रश्नांची घर केलं आहे. गेल्या तीन दिवसात महाराष्ट्रात २६ टक्क्यांनी रुग्णांमध्ये वाढ झाली आहे तर एकट्या मुंबईत तीन दिवसांत २९ टक्के रुग्णांत वाढ झाली आहे.

या सगळ्यांमध्ये घडणारी चांगली गोष्ट म्हणजे या वर्षांची सुरुवात झाली आहे ती म्हणजे १५ ते १८ वर्षाच्या वयोगटातल्या मुलांचे लसीकरण . ६५० केंद्रांवर लसीकरणासाठी तब्बल आठ लाख मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. या मुलींसाठी विशेष केंद्रांची सोय करण्यात आली आहे.

त्याचबरोबर WHO ने एक नवीन दिलासा देणारी बातमी समोर आणली आहे. ज्याला जर तर ची संज्ञा जोडली असली तरी बातमी नक्कीच प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. या वर्षात कोरोना पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतो, असे विधान नुकतेच वर्ल्ड हेल्थ ॲारगनायजेशनने केले आहे. पण केवळ विकसीत देशात नव्हे , तर खेडोपाडी लस पोहोचणे आवश्यक असल्याचे WHO ने सांगितले आहे. सद्य स्थितीनुसार जगाच्या ७० टक्के शहरांमध्ये लसीकरण झाले आहे, मात्र खेड्यात केवळ एक टक्का लसीकरण झाले असल्याचे संस्थेचे सांगणे आहे. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे WHO ने स्पष्ट सांगितले आहे.
राज्याच्या बाबतीत सध्या कोरोना वेग वाढत असल्याने कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ७०० नटापेक्षा जास्त ॲाक्सिजन वापरावा लागल्यास लॅाकडाऊनचा विचार करु, मात्र नियम पाळा, असेही त्यांनी नमूद केले.

एकुणातच गेले दोन वर्षांत ठप्प झालेलं जग आता कुठे रुळावर येत आहे. या गाडीला ब्रेक लागू नये म्हणून आता प्रत्यकाने खबरदारी घेणं आवश्यक आहे, हेच खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा