पाचशे रुपयांची नोट मागे घेण्याचा किंवा हजाराची नोट पुन्हा नव्याने चलनात आणण्याचा कोणताही हेतू नाही – गर्व्हनर शक्तीकांत दास

9

मुंबई, ८ जून २०२३ : दोन हजाराच्या नोटा रिझर्व बँकेने जमा करून घ्यायला सुरुवात केल्यापासून लोकांच्या मनात शंकांचे काहूर ऊठले आहे. परंतु आता पोस्ट मॉनेटरी पॉलीसी ब्रिफींग करताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी प्रेस ब्रिफींग करताना महत्वाची माहीती दिली आहे. आपला पाचशे रुपयांची नोट मागे घेण्याचा किंवा हजाराची नोट पुन्हा नव्याने चलनात आणण्याचा कोणताही हेतू नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन हजाराच्या नोटा बदलून किंवा डीपॉझिट करण्याचा आदेश दिल्यानंतर घेतलेल्या प्रेस ब्रिफींगमध्ये आरबीआय गर्व्हनर यांनी लोकांच्या मनातील भिती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटांना बदलण्याचे काम चालू राहणार आहे. या नोटा परत करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला आहे. बॅंकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी रांगा लागल्याचे फारसे चित्र दिसत नाही. परंतू आता पाचशे आणि हजाराच्या नोटाबाबत पुन्हा सरकार काय निर्णय घेतेय याची धाकधूक नागरिकांना लागलेली आहे. परंतू बॅंकाचा रेपो दर कायम ठेवतानाच आता नागरिकांच्या मनातील या प्रश्नावर रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी नविन माहिती दिली आहे.

आजपर्यंत नागरिकांनी २००० रूपयांच्या १.८० लाख कोटी नोटा परत आल्या आहेत. म्हणजे दोन हजाराच्या चलनात असलेल्या नोटांपैकी ही जवळपास निम्मी रक्कम असल्याचे पत्रकारांशी संवाद साधताना शक्तीकांत दास यांनी सांगितले. अगदी शेवटच्या दिवशी नोटा बदलण्यासाठी किंवा डीपॉझिट करण्यासाठी नागरिकांनी बॅंकात गर्दी करू नये. आताच नोटा बदलून घ्यावात असेही त्यांनी आवाहन केले आहे. तुम्ही तुमच्या सवडीनूसार बॅंकात जाऊन दोन हजाराची नोटा बदलू किंवा डीपॉझिट करू शकता. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दहा ते पंधरा दिवसात गर्दी करु नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दोन हजाराच्या जवळपास ८५℅ नोटा बॅंकामध्ये डीपॉझिट झाल्या असून हे अपेक्षेनूसारच घडल्याचेही दास यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एमपीसीच्या ताज्या झालेल्या बैठकीनंतर रिझर्व्ह बॅंकेने बॅंकाचा रेपो रेट ६.५℅ वरच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे होम लोन घेतलेल्या किंवा घेणाऱ्या नागरिकांचा ईएमआय व्याजाचा दर कायम रहाणार आहे. त्यात वाढ होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा