तूर्तास लॉक डाउन नाही, पुढील दोन दिवसात निर्णय घेऊ: उद्धव ठाकरे

मुंबई, १० एप्रिल २०२१: महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता राज्यासाठी ठोस निर्णय घेण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले. ज्यामधे लाॅकडाऊन चे संकेत सुरूवातीपासूनच मुख्यमंत्री देत होते. तर भाजपचा पुर्ण लाॅकडाऊन ला विरोध आसल्याचे दिसले.
• एकंदरीत सर्वनेत्यांनी काय मत मांडले याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेवू……
बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले……
सर्वंनी एकत्र  मिळून एकमुखी निर्णय घेण्याची वेळ आहे….
राज्यात लाॅकडाऊनची वेळ आली….
यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये म्हणून लाॅकडाऊनची गरज ….
लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही….
१५ ते २१ एप्रिल पर्यंतचे दिवस गंभीर ….
लसीकरणा नंतर ही कोरोनाची लागण ….
फडणवीस नव्हते म्हणून काल निर्णय झाला नाही,अन्यथा कालच निर्णय झाला आसता….
कार्यालयच्या वेळा बदला….
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊनची गरज आहे…..
लाॅकडाऊन लागला तर महिन्या भरात कोरोनावर नियंत्रण मिळवू…..
तरुणांना अधिक कोरोनाची बाधा …..
संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन गरजेचा….
कोरोना चेन तोडण्यासाठी लाॅकडाऊनचाच पर्याय…..
कळत नकळत होणारा प्रसार घातक…..
लसीचे दोन डोस घेऊन ही कोरोनाचा संसर्ग होत आहे…..
• उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलं……
मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आपला पाठिंबा आणि सहकार्य आसेल…..
सर्वांनी मिळून निर्णय घ्यावा……
रेमडेसिवीर चा कृत्रिम तुटवडा होतोय या कडे लक्ष दिले पाहीजे…..
ऑक्सिजन संदर्भात नियमावली हवी…..
गरीब वर्गाला मदत द्यावी……
• राज्यआरोग्य मंत्री : राजेश टोपे
१५ ते २० या दिवसात कोरोनाचा उद्रेक होऊन  संख्या  १२ लाखांच्या घरात जाऊ शकते……
महाराष्ट्रात रेमडेसिवीर चा तुटवडा होत आहे…..
राज्याला वेळवर लस मिळायला हवी…..
राज्यात लसींचा तुटवडा….
सध्या राज्याला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे…..
महिन्याला १ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन पुढे लागतील……
• लोकांचा जीव वाचवणं हि पहिली प्राथमिकता आहे : एकनाथ शिंदे
• मीरा भाईंदरमधे ऑक्सिजन साठा चार दिवस पुरेल इतकाच : एकनाथ  शिंदे
• काँग्रेस नेत्यांची मते…..
जो निर्णय होईल त्याआधी जनतेला काही दिवस आधी कळवा : अशोक चव्हाण
आपण रूग्णसंख्या लपवली नाही : अशोक चव्हाण
पुर्ण लाॅकडाऊन नको : अशोक चव्हाण
लोकांचा जीव वाचणं हि आपली प्राथमिकता : नाना पटोले,बाळासाहेब थोरात
• भाजपने बैठकीत अशी भूमिका मांडली…….
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस…….
राज्यात बेडची संख्या वाढवा……
राज्यात आरोग्य सेवा सुधरवा……
राज्यात निर्बंध हवेत……
ऑक्सिजन साठा वाढवा……
छोटे व्यवसायिक संकटात……
छोट्या  उद्योजकांना पर्याय  दिला पाहीजे……
लोकांनी जगायचं कसं……
कोरोना रिपोर्ट तात्काळ मिळतील याचे उपाय योजना करा……
राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा…..
आरटीपीसीआर अंतर्गत तात्काळ कोरोना  रिपोर्ट द्या…..
निर्बंध हवेत पण जनतेचा आणि व्यापार्यांचा उद्रेक लक्षात घ्या…..
मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी नेत्याना समजवा……
लाॅकडाऊन वरून काँग्रेस मधे एकमत नाही : प्रविण दरेकर
लाॅकडाऊन वरून काँग्रेस मधे मतभेद : प्रविण दरेकर
लोकांना मानसिक दिलासा द्या : प्रविण दरेकर
आमदारांचे विकास निधी २ कोटीने कमी करा आणि  कामगारांना ५ हजार रुपये द्या : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
या सर्व मतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांच्या भूमिकेच स्वागत करत आपली भूमिका स्पष्ट करत सुरवातीला आठ दिवसांच्या कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेतला.तसंच ८ दिवसांमध्ये हळूहळू एक एक सुविधा सुरू करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले तसेच जनतेला थोडी कळ सोसावी लागेल असही ते म्हटले.त्यानंतर तज्ञांनी १४ दिवसांचा लाॅकडाऊन हवा असे  सांगितले.तर तज्ञांच्या मते उद्धव ठाकरे सहमत आसल्याचे ही सांगितले.तसेच ते पुढे म्हटले आरोग्य सुविधा वाढवण्याकडे लक्ष देणार आसून याच्या पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:  निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा