कोणत्याही आमदाराने आपल्या कार्यकर्त्यांसाठी लॉबिंग करू नये- नितीन गडकरी

नागपूर, ६ ऑगस्ट २०२२: आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही, लॉबिंग चालनार नाही. निवडून येण्याची पात्रता असणारे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना कानपीचक्या दिल्या.

जरीपटका येखील महात्मा गांधी शाळेच्या प्राणांगणात भारतीय जनता पक्षाच्या विस्तारीत कार्यकारणीच्या बैठकीत गडकरी बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, अनिल सोले, अशोक मानकर, डाॅ. मिलिंद माने, संजय भेंडे, डाॅ. उपेंद्र कोठेकर, संदीप जोशी, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही आमदाराने आपल्या कार्यकर्त्यांसाठी लॉबिंग करू नये

यावेळी गडकरी म्हणाले, “आगामी महापालिका निवडणूकीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. कोणत्याही आमदाराने आपल्या कार्यकर्त्यासाठी लॉबिंग करू नये, अजूनही कुठल्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची नावे निश्चित नाहीत. जो प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतो आहे अशा खऱ्या सामान्य कार्यकर्त्याचा विचार केला जाईल, ” असेही गडकरी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रकाश जगताप

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा