वैद्यकीय वाहतुकीत अडथळे नको : गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश

नवी दिल्ली, दि. ११ मे २०२०: कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी वैद्यकीय व्यावसायिक आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीवर लावलेल्या निर्बंधांबाबतचा मुद्दा प्राधान्याने चर्चिला गेला.

याच बैठकीचा पाठपुरवा करत, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले असून सर्व वैद्यकीय व्यावसायिक आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांशी संबंधित लोकांची वाहतूक सध्या मानुष्याचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यांचा प्रवास आणि वाहतूक काहीही अडथळे न येता होऊ द्यावी, असे त्यात लिहिले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या वाहतुकीत अडथळे आणल्यास, कोविड आणि बिगर कोविड अशा दोन्ही प्रकारच्या वैद्यकीय सेवा बाधित होऊ शकतात, असेही गृहमंत्रालयाने म्हंटले आहे.

याच दृष्टीने, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची, परिचारिका,
निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार आणि रुग्णवाहिका अशा सर्वांची वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. यामुळे, कोविड आणि बिगर कोविड वैद्यकीय सेवा अव्याहतपणे सुरु राहतील, त्याशिवाय, या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची आंतर-राज्य वाहतूक सुरळीत होईल, याची व्यवस्था देखील संबधित राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांनी करायची आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हंटले आहे.

तसेच, सर्व खाजगी दवाखाने, शुश्रुषा केंद्र आणि प्रयोगशाळा देखील सुरु ठेवल्या पाहिजेत, यावरही या पत्रात भर देण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी जाण्याची परवानगी वैद्यकीय व्यावसायिकांना देण्यात आली आहे. यामुळे कोविड आणि बिगर कोविड अशा दोन्ही प्रकारच्या मोठ्या रुग्णालयांवरच रुग्णांचा भार न पडता, इतर ठिकाणी उपचार होऊ शकतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा