दहावीत कोणीच नापास होणार नाही

पुणे, ३१ जानेवारी २०२१: शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची तर पालकांना थोडसा विचार करायला लावणारा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. आधी विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत पास करण्याची सवलत शिक्षकांना होती आणि विद्यार्थ्यी आठवी पर्यंतचे शालेय शिक्षण थोडे तणावमुक्त शिकत असे. आता त्याच एका बाबतीत भर पडली आहे.
सीबीएसईने दाहवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम आणला आहे. या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थ्यी गणित व विज्ञानात नापास झाला आणि त्याने ऐच्छिक विषय म्हणून घेतलेल्या कौशल्याधरित विषयात उत्तीर्ण झाला. तर त्याला पास समजला जणार आहे.
ऐच्छिक विषयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी, कॉम्प्युटर सायन्स हे विषय आहेत. जे विद्यार्थी हुशार आहेत पण अभ्यासात थोडे कच्चे आहेत त्यांचासाठी हा नियम आसल्याचे सांगितले जाते आहे.
एकंदरीत पाहीले तर या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं थोडे सोपे असून ते थोडेसे तणावमुक्त शिक्षण घेतील. मात्र, काही पालक या साठी ही चिंतित आहेत की या निर्णयामुळे मुलांच्या आयुष्यातून शिक्षणाचे महत्त्व कमी होऊ नये. म्हणजे ते हजरजबाबीपणाने वागणे सोडून  शिक्षण घेऊ नये.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा