पत्राचाळ घोटाळा : राऊतांना दिलासा नाहीच; दिवाळी देखील जेलमध्येच

4

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२२: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊतांना आज न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे राऊत यांना दसऱ्या पाठोपाठ यंदाची दिवाळी देखील जेलमध्येच साजरी करावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. राऊत यांच्या कोठडीत १३ दिवसांची वाढ करण्यात आली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे.

नेमके काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण ?

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३१ जुलैला अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची lमे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आले होते. मात्र, प्रविण राऊत यांच्या कंपनीने म्हाडा भाडेकरूंसाठी घरे न बांधताच ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा