हिंगोली जिल्ह्यात सोशल डिस्टन्सचा बोजबारा

2

हिंगोली, दि.१४ मे २०२०: हिंगोली जिल्हयातील पान कनेरगाव (ता.सेनगाव) येथील दि परभणी हिगोंली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर नागरीकांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. कोणत्याही सोशल डिस्टस्टिंगचे पालन न करता अशी गर्दी करणे म्हणजे कोरोना विषाणूच्या वाढीला मदत होऊ शकते. याठिकाणी सोशल डिस्टडटिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बँकेने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे . याठिकाणी लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमाचे पालन होताना दिसत नाही. काहीच्या तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे, बेशिस्तपणे वागणे याला कोण जबाबदार ? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्हयातील बँका, शेतीविषयी खत बियाण्याचे दुकाने या विषयी आता नियोजन करून अशा ठिकाणी गर्दी होणार नाही, याकडे नागरीक आणि शासन यांनी लक्ष देण्याची गरज पडणार असल्याचे जाणकार नागरीकांतून बोलल्या जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा