नोकिया २७८० Flip फोन लॉन्च

पुणे, ९ नोव्हेंबर २०२२ : नोकिया २७८० Flip नोकिया ने नवीन फीचर फोन नोकिया २७८० Flip लॉन्च केला आहे. नोकिया फोनमध्ये Qualcomm २१५ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. नोकियाने ब्लू आणि रेड कलरमध्ये फोन सादर केला आहे.तसेच या फोन मध्ये वेगळे फिचर्स देखील आहेत.

नोकिया २७८० फ्लिप फिचर्स-

हा फ्लिप फोन आहे, त्यामुळे या फोनमध्ये दोन डिस्प्ले उपलब्ध आहेत. या फोनमध्ये २.७ इंचाची मुख्य TFT स्क्रीन आणि १.७७ इंची सेकंडरी स्क्रीन आहे. या फोनमध्ये ३२० x २४० पिक्सेल रिझोल्यूशनसह QVGA डिस्प्ले असून क्लॅमशेल फ्लिप डिझाइन आहे. तसेच फोनमध्ये ५ मेगापिक्सल चा सिंगल बॅक कॅमेरा आहे. यासोबतच फ्लॅश लाइट देखील आहे – आणि नोकिया २७८० फोनमध्ये क्वालकॉम २१५ प्रोसेसर आहे.

रॅम आणि मेमरी- नोकियाने फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ५१२ एमबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. याशिवाय मेमरी कार्डद्वारे फोनची मेमरी ३२ GB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये १,४५० mAh बॅटरी आहे. ही बॅटरी फोन मधुन बाहेर काढता येते कंपनीच्या मते, 4G सिमवर फोनची बॅटरी १८ दिवस टिकू शकते.

नेटवर्क- हा एक 4G फोन आहे जो 3G आणि 2G नेटवर्कवर काम करतो. कलर- नोकियाने हा फोन ब्लू आणि रेड कलरमध्ये सादर केला आहे. OS- हा फोन KaiOS ३.१ वर काम करतो.

इतर फीचर्स- याशिवाय ब्लूटूथ, वाय-फाय आणि 3.5 मिमी जॅक सारखे फीचर्स फोनमध्ये आहेत. या फोनमध्ये युट्युब, गुगलसारखे अॅप्सही चालतात.

नोकिया २७८० ची किंमत
नोकिया २७८० Flip सध्या US मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने फोनची किंमत भारतीय चलनात $90, डॉलर सुमारे ७ ४५० रुपये ठेवली आहे. हा फोन भारतात लॉन्च करण्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, पण नोकिया कंपनी हा फोन भारतातही लॉन्च करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा