दिल्ली: भारतासमोर सध्या सर्वात मोठा कोणता प्रश्न असेल तर तो बेरोजगारी. वाढती लोकसंख्या आणि सध्या ओढवलेली आर्थिक मंदी यामध्ये आजचा तरुण भरडला गेला आहे. दरवर्षी लाखो बेरोजगार बाहेर पडत आहे. परंतु सध्या सरकारी धोरणामुळे आणि नियमांमुळे बऱ्याच कंपन्या बंद पडत आहे. त्यामुळे बेरोजगारी अचानक ओढवत आहे.
या सगळ्याचा विचार करत सरकारने नवी योजना आणली आहे. सरकारने अचानक आलेल्या बेरोजगारी वर मात करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जर तुमची नोकरी गेली तर सरकार तुमच्या २ वर्षाचा खर्च उचलणार आहे.
नोकरदरांसाठी मोदी सरकारने घेतला आहे मोठा निर्णय. तुमची नोकरी गेल्यास सरकार उचलणार आहे तुमचा खर्च. हा खर्च २४ महिने म्हणजेच २ वर्षासाठी असणार आहे. हा खर्च कर्मचारी रज्याविमा निगमच्या अटल विमा कल्याण अंतर्गत खाजगी नोकरदरांसाठी ही योजना आहे. इ एस आय सी ने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. इ एस आय सी ने ट्विट करत असे सांगितले आहे की, नोकरी जाणे म्हणजे आर्थिक नुकसान होण्या सारखेच आहे त्यामुळे अशा नोकरदारांना २४ महिने एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे, असे सांगितले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे. यासाठी इ एस आय सी च्या वेबसाईटवर जाऊन एक फॉर्म डाउनलोड करावा लागणार आहे. हा फॉर्म भरून इ एस आय सी च्या नाशिकच्या कोणत्याही शाखेत सांगून जमा करू शकता. यासाठी वीस रुपयाच्या नॉन जुदीशियल पेपरला नोटरी ने एफिडेविट करावे लागणार आहे. या ए बी १ फॉर्म पासून ते एबी ४ फॉर्म भरावा लागणार आहे. यासाठी लवकरच ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी याआधी दोन वर्षाचा रोजगार असणे आवश्यक होते परंतु आता यात सूट देण्यात आली आहे व हा कालावधी सहा महिन्याचा करण्यात आला आहे.